हा प्याला शेवटचा, हा प्याला शेवटचा
आता थेंब सुद्धा नको, साधा गंध सुद्धा नको
आता थेंब सुद्धा नको, साधा गंध सुद्धा नको
आली पेंग, दिली गालावर टिचकी
हा प्याला शेवटचा, हा प्याला...
उजाडले तरी काय, उजाड धरती
मावळता दिस येते, डोळ्याला भरती
उजाडले तरी काय, उजाड धरती
मावळता दिस येते, डोळ्याला भरती
भरतीचा चांद माझ्या पेल्यातून झुले
भरतीचा चांद माझ्या पेल्यातून झुले
घोट-घोट सवे रात कसनुशी बोले
हा प्याला शेवटचा, हा प्याला...
कुणी दिला हात, कुणी सावरले मला
कोण रागावले, कोण घाबरले मला
कुणी दिला हात, कुणी सावरले मला
कोण रागावले, कोण घाबरले मला
भिऊ नका, मनातले बोलणार नाही
भिऊ नका, मनातले बोलणार नाही
मला ठाव, कुणालाच कळणार नाही
हा प्याला शेवटचा, हा प्याला...
दिसतात जुने-जुने कितीक चेहरे
जुना-जुना स्पर्श माझ्या देहात थरारे
दिसतात जुने-जुने कितीक चेहरे
जुना-जुना स्पर्श माझ्या देहात थरारे
जुने घाव आता पुन्हा नव्याने नको रे
जुने घाव आता पुन्हा नव्याने नको रे
हालचालीवर माझ्या क्षणांचे पहारे
आता हा प्याला शेवटचा, हा प्याला...
अरे, आता नको पाजू मला चढली अफाट
दिसू लागे नजरेच्या पल्याडची वाट
आता नको पाजू मला चढली अफाट
दिसू लागे नजरेच्या पल्याडची वाट
देहा सवे वाटेस त्या जाणे नाही होणे रे
देहा सवे वाटेस त्या जाणे नाही होणे
बहिऱ्याच्या गावी नको म्हणायला गाणे
आता हा प्याला शेवटचा, हा प्याला शेवटचा
आता थेंब सुद्धा नको, साधा गंध सुद्धा नको
आता थेंब सुद्धा नको, साधा गंध सुद्धा नको
आली पेंग, दिली गालावर टिचकी
Comments (0)